अपघाती मृत्यू झालेल्या कर्जदारांचा विमा उतरल्याने कुटुंब झाले कर्जमुक्त !

Spread the love

विम्यातुन मिळालेले दीड लाखाचा धनादेश कुटुंबाकडे केला सुपूर्त; बप्पाश्री बँकेची कार्यतत्परता

माजलगाव, दि.३: येथील बप्पाश्री अर्बन को.ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेंचे कर्जदार महादेव कुटे यांनी ३ लाखाचे कर्ज घेतले होते. दुर्देवाने त्यांचा तीन महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यावर कुटुंबासमोर कर्ता पुरुष दगावल्याने आत्ता कर्ज फेडायचे कशे हा प्रश्न होता. परंतु कर्जदार कुटे यांचा विमा उतरवल्याने त्यांचे १ लाख ४४ हजाराचे कर्ज तर माफ झालेच परंतू त्यांच्या कुटुंबाला १ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश घरपोच बप्पाश्री बँकेने सुपूर्त केला.

 

आजकाल बहुतेक असुरक्षित कर्जे जसे की वैयक्तिक कर्जे विम्यासह येतात. यामध्ये, प्राथमिक कर्जदाराचा (पहिला कर्जदार) विमा उतरवला जातो. कर्जाच्या संपूर्ण परतफेडीच्या कालावधीपर्यंत विमा संरक्षण चालू राहते. दरम्यान कर्जदारासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे कर्ज माफ केले जाते. तसेच ज्या विमा कंपनीकडून कर्जाचा विमा काढला जातो, त्या विमा कंपनीकडून बँक कर्जाचे पैसे घेते. परंतू अनेक बँका ह्या कर्ज देतात मात्र कर्जदारांचा विमा काढत नाहीत. अशा परिस्थितीत मात्र हा कर्जदार दुर्देवाने दगावला तर त्याच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यास मात्र अपवाद ठरत माजलगाव शहरातील बप्पाश्री अर्बन को.ऑफ सोसायटी बँकेकडून भटवडगाव येथील महादेव गोवर्धन कुटे यांनी २०२१ मध्ये व्यवसायाकरिता ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याच्या परत फेडीपोटी त्यांनी १ लाख ४४ हजार रुपयांचा भरणा केला होता. मात्र दुर्देवाने दुचाकी अपघातात महादेव कुटे (वय ३५) यांच्या मृत्यू झाला होता. महादेव कुटे हे कुटुंबातील कर्ते असल्याने मोठा आघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा अनुक्रमे ७, ५, ३ व १ वर्षाचे अपत्य आहेत. यामुळे कर्ज फेडायचे कशे हा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. परंतू काही दिवस उलटताच बँकेचे चेअरमन महेश उर्फ बाळासाहेब सोळंके यांनी कुटे कुटुंबाची भेट घेऊन कर्जाचा ताण घेऊ नका. आम्ही कर्ज घेताना महादेव कुटे यांचा विमा उतरवला होता, असा धीर दिला, त्यानुसार ३ लाख रुपयांचा विमा मंजुर झाला.
त्यानुसार कर्जापोटी थकीत १ लाख ४४ हजार कपात करून १ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश आज सोमवार (दि.३) रोजी महादेव कुटे यांच्या घरी जाऊन बँकेचे चेअरमन महेश उर्फ बाळासाहेब सोळंके, बँकेचे व्यवस्थापक विजय कूरे, माजी सरपंच गिताराम अनभुले यांच्या हस्ते मयत महादेव कुटे यांच्या पत्नी भाग्यश्री कुटे व वडील गोवर्धन कुटे यांच्याकडे सुपूर्त केला.

Leave a Reply