माजलगाव पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला

Spread the love

एक जण ताब्यात; दोन फरार

माजलगाव, दि.२४: तालुक्यातील ढोरगाव शिवारात अंदाजे पाच ते सहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडल्याची कारवाई माजलगाव ग्रामीण पोलिसांनी प्रशिक्षणार्थी Dysp श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी एक जण ताब्यात घेतला असून दोन जण फरार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज(दि.२४) शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या माहितीवरून
प्रशिक्षणार्थी Dysp श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोरगाव शिवारात माजलगाव ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये बाबा, हिरा गुटखा असलेल्या पोते आढळून आले. त्या गुटखा असलेल्या गोण्या जप्त करत एक जण ताब्यात घेतला. तर दोन जण फरार झाले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटखळ यांच्यासह पोलीस शिवनाथ भोसले, उद्धव राऊत, विलास खराडे, अशोक मिसाळ, विष्णू म्हेत्रे, मनोज झाटे, कैलास पोटे आदी सहभागी होते.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्याची व मुद्देमाल मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply