प्रशिक्षणार्थी Dysp श्वेता खाडे यांच्या पथकाची कारवाई

Spread the love

वाळू चोरी करणारे एक ट्रॅक्टर, दोन पिकअप पकडले

माजलगाव, दि.२०: माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व दोन पीक अप पकडले. ही कारवाई माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यास प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी असलेल्या श्वेता खाडे यांच्या पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून चोरट्या मार्गाने वाळू तस्करी सुरू आहे. या याबाबत माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यास नुकत्याच रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे यांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्या अनुषंगाने सोमठाणा हद्दीतून वाळू वाहतूक करणारे दोन पीक अप तर सादोळा येथून एक ट्रॅक्टर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खटकळ, पोलीस कर्मचारी राऊत, व्ही.बी.खराडे, डोळस यांनी केली. जप्त करण्यात आलेली दोन पीकअप व ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करिता नोंद घेण्यात आली आहे.

Leave a Reply