माजलगाव ग्रामीण पोलीस हद्दीतील घटना
माजलगाव, दि.१३: तालुक्यातील एका गावात शेतामध्ये बकऱ्या चारणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील एकदरा येथे घडली आहे. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून मंगळवारी तिघा जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एकदरा येथील पिढीत दोन अल्पवयीन मुली शेतात साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शेळ्या चारत होत्या. तिघे जण मोटरसायकवरुन तेथे आले व यातील दोघा जणांनी या दोघींना जबरदस्ती उसामध्ये घेऊन जात अत्याचार केला. त्याचप्रमाणे रविवार रोजी अकरा वाजता दोन मुली पैकी एका पीडितेला वरील आरोपींपैकी एका मुलीला धमकावून तिसऱ्या एका जनासोबत संबंध ठेवण्यासाठी धमकावत अत्याचार केला. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून विकास बरडे ,करण माळी व केशव राऊत या तिघांजनाविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आज (दि.१३) मंगळवारी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीनही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहे.
जाहिरात…