आप्पासाहेब जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

Spread the love

मुंबई, दि.१४: बीड जिल्हा शिवसेनेचे (उ.ठा. गट) भूतपूर्व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी आज मुंबई येथे भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहे. आप्पासाहेब जाधव यांची मागील महिन्यात त्यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्या नंतर पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यातच त्यांनी आज फडणवीस यांची भेट घेतली मागे काय राजकारण आहे ? याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

शिवसेना (उ.ठा.गट) पक्षाच्या यांच्या वतीने राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने मागील महिन्यात बीड जिल्ह्यात दि.१९ मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाली. यादरण्यात दि.१८ मे रोजी भूतपूर्व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाला. यानंतर प्रसार माध्यमांसमोर येऊन आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पैसे घेऊन पद वाटत असल्याचा आरोप करत, त्यांना संतप्त होऊन दोन चापटा मारल्याचा जाहीर केले होते. त्याबाबत मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटून घडला प्रकार सांगणार असल्याचे सागितले होते.
दरम्यान आप्पासाहेब जाधव व सुषमा अंधारे मारहाण प्रकरणाला महिना उलटत नसताना आज (दि.१४) बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबई येथे भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंन्द्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले तरी आप्पासाहेब जाधव हे भाजपात प्रवेश करण्याबाबत चाचपणी करत असल्याची चर्चा होत आहे.

आप्पासाहेब जाधव म्हणतात …

होय मी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही माझी सदिच्छा भेट होती, सध्या तरी मी शिवसैनिकच आहे.

जाहिरात …

 

Leave a Reply