सोळंके कारखाना निवडणुकीत विरोधाला विरोध करणार नाही – नितीन नाईकनवरे
माजलगाव, दि.२३ : लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचा पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. ही निवडणुक आमदार प्रकाश सोळंके यांनी बिनविरोध काढावी, केवळ विरोधासाठी – विरोध करण्यात येणार नाही. मात्र आ.सोळंके यांनी उस भावाचा वेळो – वेळी दिलेला शब्द पाळावा. कारखान्याचे संस्थापक कै. सुंदरराव सोळंके यांनी चालवल्या प्रमाणेच कारखाना सुरळीत चालवुन उस उत्पादक शेतक-यांना योग्य भाव द्यावा, असे आवाहन माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आ.प्रकाश सोळंके यांना केले आहे.
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी उमुख्यमंत्री कै. सुंदरराव सोळंके यांनी शेतक-यांच्या हितासाठी केली. या कारखान्याची पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असुन केवळ विरोधासाठी विरोध करणे. याकरीता ही निवडणुक लढविण्याची भुमिका मी कधी घेतलेली नाही, पूर्वीसुद्धा छत्रपती सहकारी साखर कारखाना बिनविरोध निघावा अशी आमची भूमिका होती. त्याचप्रमाणे आमदार प्रकाश सोळंके यांनी सोळंके सहकारी साखर कारखाना कै.सुंदरराव सोळंके यांनी शेतकरी हितासाठी ज्याप्रमाणे कारखाना चालविला. त्याच धर्तीवर कारखाना चालवावा, तसेच आ.सोळंके यांनी उसदरा बाबत वेळोवेळी दिलेला शब्द पाळावा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शंभर रूपये भाव देण्याचा दिलेला शब्द देखील पाळलेला नाही, तो शब्द पूर्ण करावा. तसेच यावर्षी देखिल जाहिर केलेला भाव शेतक-यांना अदा करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. शेतक-यांच्या हितासाठी होणारी ही निवडणुक कारखान्याच्या सभासदांनी बिनविरोध काढावी, असे आवाहन माजलगाव बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नितीन नाईकनवरे यांनी केली आहे.
उपपदार्थ निर्मिती; मग ३००-४०० अधिक भाव का नाही ?
माजलगाव तालुका परिसरात तीन साखर कारखाने आहेत. त्यापैकी सोळंके सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता चांगली असून विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यात वीज निर्मिती प्रकल्प व डिस्टलरी हे प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला जास्तीचा भाव मिळत नाही. वास्तविक पाहता सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेत 300 ते 400 रुपये अधिक भाव मिळावा, अशी ही अपेक्षा नितीन नाईकनवरे यांनी व्यक्त केली आहे.