डॉ.बिवरे यांच्या आईची पोलीसात तक्रार
माजलगाव, दि.२५ ( प्रतिनिधी ) शहरातील बायपास रोडवर असणा-या शतायुषी रूग्णालयाच्या गेटला कुलुप लावत अनोळखी इसमाकडुन खंडणीची मागणी केली. तसेच या रूग्णालयाच्या इमारतीत असणा-या निवासी विद्यार्थ्यांना धमकावल्याचा प्रकार घडला असुन या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

शहरातील बायपास रोडवर डॉ. प्रसाद बिवरे यांचे शतायुषी रूग्णालयाची इमारत आहे. मागील अनेक दिवसांपासुन डॉ.प्रसाद बिवरे हे पुणे येथे वास्तव्यास आहेत. येथील इमारतीमध्ये त्यांच्या आई कल्पना वसंत बिवरे या राहत राहतात. तसेच उर्वरीत इमारत ही मुकबधीर विद्यालयास व खाजगी शिकवणीसाठी किरायाने दिलेले आहे. या इमारतीच्या गेटला मंगळवार (दि.२३) सकाळी अज्ञात व्यक्तीने तोंडाला रूमाल बांधुन येवुन कुलुप लावले व खंडणीची मागणी केली. तसेच त्याठिकाणी असणा-या विद्यार्थ्यांना धमकावले व तेथुन पोबारा केला. या घटनेमुळे येथील विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
याप्रकरणी कल्पना वसंत बिवरे यांनी बुधवारी (दि.२४) अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणी मागितल्या व धमकावल्या प्रकरणी माजलगाव शहर पोलीसात तक्रार दिलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत याप्रकरणी शहर पोलिसात कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
त्या आरोपीचा शोध सुरू …
शतायुषी रूग्णालयाला कुलुप लावणा-या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनास्थळाला भेट देउन पाहणी केली आहे. परिसरातील सिसीटीव्ही फुटेज मागविले असुन लवकरच खंडणी मागणारा व धमकावणा-या आरोपीस ताब्यात घेण्यात येईल. साध्या वेशातील पोलिस परिसरामध्ये नजर ठेवुन आहेत असे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सांगितले.
