बापरे … चक्क स्मशानभूमीकडे जाणार रस्ता न करताच; हडपला १० लाखांचा निधी !

Spread the love

तात्काळ रस्ता करा किंवा संभाधितांवर कारवाई करा; शिवा संघटनेची मागणी

माजलगाव, दि.९: येथील नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी अशा अर्धा डझनभर माणसांना बेकायदेशीर व भष्ट्र कारभारामुळे जेलवारी झाली. मात्र नगर परिषदेचा कारभार सुधारायला तयार नाही. त्यातच आत्ता चक्क शहरातील स्मशानभुमिकडे जाणारा रस्ता न करताच १० लाखाचा निधी हडप करण्यात आल्याचा प्रकरण उघडकीस आले आहे. 

येथील नगर परिषद अंतर्गत कचारवाडा ते लिंगायत व राजस्थानी समाजाच्या स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रस्ता करण्याकरिता १० लाखाचा निधी मंजूर झाला होता. त्यास प्रशासकीय मान्यता सन २०२१ मिळाली. तत्कालीन पदाधिकारी व ठेकेदार यांनी काम पूर्ण न करताच बे कायदेशीर रित्या संपूर्ण बिलाची रक्कम उचलून घेत अपहर केला. याबाबत या वॉर्डातील नगरसेवक व तत्कालीन नगराध्यक्ष यांची भेट घेऊन सदरील काम पूर्ण करण्याबाबत मागणी केली होती. यावर रस्ता पूर्ण करून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आजतागायत रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे एक तर रस्ता तात्काळ करण्यात यावा किंवा संबंधितावर कारवाई करून गुन्हे दखल करण्यात यावेत, अशी मागणी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक IAS आदित्य जिवने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिवा संघटनेने केली आहे. तसेच याचा तात्काळ कारवाई संदर्भात विचार न केल्यास नगर परिषद कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवा संघटनेचे शहराध्यक्ष पशुपती गवरकर, सचिव मंगलनाथ देशमाने आदींसह शिवा संघटनेच्या 50 ते 60 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदन मंजुर करून IAS जिवने कार्यवाही करणार का ?

चक्क प्रशासकीय मान्यता घेऊन स्मशान भूमी चा रस्ता न करताच त्यात १० लाखाचा अपहार झाला असल्याचे प्रकार शिवा संघटनेने समोर आणला आहे. त्या बाबत IAS आदित्य जिवने यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे. आत्ता जिवने हे याची तात्काळ चौकशी करून संबधित दोषीवर कारवाही करणार का ? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply