माजलगाव, दि.७: सोशल मीडियावर दोन समाजात द्वेषमूलक बाब प्रसारित केल्या प्रकरणी माजलगाव येथे एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून समाजात द्वेष पसरेल यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
भारत तुकाराम बोडखे रा. नवनाथ नगर, माजलगाव याने आणि इतर काही लोकांनी सोशल मीडिया वरून माजलगाव येथील अतिक्रमण हटाव मोहिमेचे फोटो आणि माहिती प्रसारीत करुन या मोहिमेस हिंदू राष्ट्राची सुरुवात, बुलडोझर राज असे नामाभिमान देऊन, संबोधन देऊन दोन समाजात दरी निर्माण होइल असे शब्द प्रसारीत केली आहे म्हणुन त्याचे वर भारतीय दंड विधान ५०५ (१) ब २ प्रमाणे माजलगाव शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.
पोलिस सोशल मिडिया वर लक्ष ठेऊन आहे आणि जो कोणी कोणत्याही खात्रीशीर माहिती शिवाय मुद्दाम द्वेषमूलक काही प्रसारीत करेल. त्याचे विरुध्द कडक कायदेशीर उपाययोजना करण्यास पोलिस कटिबध्द असल्याची माहिती माजलगाव उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक श्री.पंकज कुमावत यांनी दिली आहे.