IPS पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई
माजलगाव, दि.१३: तालुक्यातील पात्रुड येथे IPS पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारून १ लाख २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई केली. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पात्रुड येथे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती माजलगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाचे पदभार असलेले IPS पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून त्यांच्या पथकाने आज (दि.१३) शनिवारी पात्रुड येथील मोमीन इब्राहीम अब्दुल हमील यांच्या राहते घरा समोर पत्र्याच्या शेडमध्ये चोरून लपून RMD, गोवा, राज निवास, विमल पान मसाला, हिरा पान मसाला बंदी घातलेली असताना करण्यात येत होती. यावर छापा मारून १ लाख २५ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई केलेल्या पथकात पोलीस हवालदार अशोक नामदास, युवराज चव्हाण, गणेश नवले, संतराम थापडे, अजय गडदे, प्रभा ढगे यांचा समावेश होता.