माजलगाव, दि.५: IPS पंकज कुमावत यांच्या पथकाने आज (शुक्रवारी) मटका अड्डयावर छापा मारून १ लाख ८७ हजार रुपयांचा रोख रक्कम व मुद्दमाल जप्त केला. तसेच ३२ जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने अवैध व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असणारे IPS सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे आहे. या दरम्यान त्यांना नागरिकांतून शहरात मटका सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. यावर त्यांनी तात्काळ दखल घेत आज (शुक्रवारी) शहरातील जुना बाजार रोड व जुना मोंढा येथे चोरून लपून मिलन नाईट, कल्याण मटका, मिलन डे, मुंबई बाजार या नावाने जुगार खेळणारे आढळून आले. यात २७ जणांना ताब्यात घेत १ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. तसेच २७ जनांसह मटका बुक्की चालक शेख आशि शेख हारूज, शेख जहीर शेख खदिर, शेख इर्शाद शेख इब्राहिम, शेख अतिक शेख वहाब, सत्तारखान समशेरखान अशा ३२ जणांविरुद्ध विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अनिल भिमराव राठोड व पोलीस नाईक अशोक अंजनराव नामदास यांच्या फिर्यादीवरून कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये फिर्याद दिली आहे.
सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार अनिल भालेराव, पोलीस नाईक अशोक नामदास, युवराज चव्हाण, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, संतराम थापडे यांनी केली.