माजलगाव नगर परिषदेची कारवाई
माजलगाव, दि.३: शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आत्ता नगर परिषदचे परिवेक्षाधीन मुख्याधिकारी IAS आदित्य जिवने मालमत्ता कर व नळपट्टी थकीत ठेवणाऱ्या कडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार आज शहरातील अनेक मालमत्ता सील केल्याची कारवाई नगर परिषदेने केली.
माजलगाव नगर परिषदेचा मालमत्ता व नळपट्टी थकीत आहे. वारंवार मालमत्ता धारकांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस देऊन ही भरण्यात येत नव्हती. अखेर परिवेक्षाधीन मुख्याधिकारी IAS आदित्य जिवने यांनी थकबाकी बाबत कठोर पाऊल उचलत वसुली मोहीम राबवली. त्यानुसार आज (दि.३) बुधवारी शहरातील अनेक व्यापारी संकुल व दुकाने सिल केल्याची कारवाई केली. मालमत्ता सील करण्याची कारवाई मोहीमेत कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, चंद्रकांत बुलबुले, बाप्पू उजगरे, भगवान कांबळे, शंकर चव्हाण, सखाराम होके व सर्व वसुली कर्मचारी होते.
मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा
माजलगाव शहरातील ज्या मालमत्ता ची कराचा भरणा बाकी आहे. त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे कराचा भरणा करावा. अन्यथा उद्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे न. प.कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे यांनी सांगीतले.