दोन दिवसात कुणा-कुणाची अतिक्रमणे हटणार ?

Spread the love

अतिक्रमणे हटल्यामुळे शहरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; IAS आदित्य जिवने यांच्या कारवाईचे कौतुक

माजलगाव, दि.२: माजलगाव नगर परिषदेस परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून आलेले IAS आदित्य जिवने यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. त्यानुसार आज (मंगळवारी) शहरातील रस्त्यावरील अतिक्रमित ९० दुकानी जमीनदोस्त केल्या तर १५० दुकानावर कारवाई केली आहे. ही अतिक्रमण हटाव मोहिम दोन दिवस चालणार असल्याने आत्ता कुणाकुणाची अतिक्रमणे जमीनदोस्त होणार याबाबत चर्चेला उधाण आले असून अनेक अतिक्रमण धारकांचा धाबे दणाणले आहेत.

माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशः फुटपाथ तर अतिक्रमित झालेच होते, त्यात कमी म्हणून की काय? अनेकांनी रस्त्यावर आपली बस्तान मांडले होते. यामुळे पादचारी यांच्यासह वाहतुकीस मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी आलेले ओपन स्पेसवर ही अतिक्रमणे झालेली आहेत. याबाबत मागील तीन महिन्यांपूर्वी खुद्द आमदार प्रकाश सोळंके यांनी ही अतिक्रमणे हटवावी. याकरिता आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून या ओपन स्पेस बाबत कारवाईची मोहिम सुरू होती. मात्र प्रत्यक्षात कारवाई केव्हा होणार याबाबत शहरवासीयांचे लक्ष होते.
त्यात दोन आठवड्यापूर्वी माजलगाव नगर परिषदेला परिवेक्षाधिन मुख्याधिकारी म्हणून आदित्य जिवने हे रुजू झाले. त्यांनी कारभार हाती घेताच या बाबीचा माहिती घेत अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार त्यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहिमेस आज (दि.२) मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू केली. दोन जेसीबी, ३ ट्रॅक्टर, नगर परिषदेचे शंभरवर कर्मचारी, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवत ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. दिवसभरात ९० अतिक्रमित दुकाने ही जमीनदोस्त केली तर १५० वर दुकानाचे पुढील अतिक्रमण हटवत कारवाई केली. त्यात शाहू नगर येथील ओपन स्पेसवर तीन प्लॉट वर संरक्षण भिंत बांधून ताब्यात घेतलेले प्लॉटवरील अतिक्रमण हटवन्यात आले.

दोन दिवसात कुणाकुणाची अतिक्रमणे हटणार ?

माजलगाव शहरातील आज हटवण्यात आलेली अतिक्रमणे ही गोरगरिबांची होती. त्या बाबत समाज माध्यमावर देखील सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांतून प्रतिक्रिया उमटल्या. त्यातून त्यांनी गोरगरिबांची अतिक्रमणे हटवली तशी ओपन स्पेस वरील, नगर परिषदेच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याबाबत अनेकांनी IAS आदित्य जिवने यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांनी ही कारवाई दोन दिवस चालणार असून कुणाची अतिक्रमणे असू द्या, त्याची कागदपत्रे तपासून कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात …

Leave a Reply