Majalgaon शहरातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

Spread the love

परिविक्षाधीन मुख्याधिकारी जिवने यांची मोहिम

माजलगाव, दि.२: येथील नगर परिषदेचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी IAS आदित्य जिवने यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. त्यानुसार आज सकाळ पासून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून नागरिकांची वाहतुकीसाठी होत असलेली कोंडी दूर केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. याबाबत वारंवार नागरिकांतून अतिक्रमण हटविण्याची मागणी होती. मात्र इतर अधिकारी याबाबत कानाडोळा करत राहत, त्यामुळे मात्र नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत. मात्र याला अपवाद ठरत आठवडाभरापूर्वी माजलगाव नगर परिषदेला परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेले IAS आदित्य जिवने यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. त्यानुसार त्यांनी नागरिकांना तात्काळ आपली अतिक्रमणे हटवावीत असे आवाहन केले होते. मात्र निर्ढावलेले अतिक्रमण धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. यावर नगर नारिषदेचे सर्व कर्मचारी रस्त्यावर येऊन आज (दि.२) मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी अँड सी रोड वरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.
मुख्याधिकारी जिवने यांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply