माजलगाव बाजार समिती निवडणूक ; ९८ टक्के मतदान… तासाभरात होणार मतमोजणीस सुरुवात
माजलगाव,दि.३०: येथील माजलगाव बाजार समितीसाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला असून सरासरी ९८ टक्के मतदान पार पडले. मतमोजणीस दुपारी ४ वाजता सुरुवात होणार आहे.
सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ९८ टक्के मतदान झाले. यात सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी ६०९ पैकी ६०१ (९८.६८%) मतदारांनी हक्क बजावला, ग्रामपंचायत मतदार संघात ४ जागांसाठी ५५३ पैकी ५४९ (९९.४०%) मतदारांनी हक्क बजावला, व्यापारी मतदार संघात २ जागांसाठी ७८५ पैकी ७३३ (९३.४०%) मतदारांनी हक्क बजावला तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागांसाठी २३३ पैकी २३० (९८.७१%) मतदारांनी हक्क बजावत जवळपास ९८ टक्के मतदान पार पडले.
तासाभरात मतमोजणीस सुरुवात होणार असून ६ वाजेपर्यंत निकाल हाती येणार आहेत. दोन्ही बाजूंची धुकधुक ताणली गेली आहे.