इतके झाले मतदान
माजलगाव,दि.३०: येथील माजलगाव बाजार समितीसाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी दुपारी १२.०० वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान शांततेत पार पडले आहे.
माजलगाव बाजार समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून ताकत लावली असून प्रतिष्ठेची केली आहे. आज (दि.३०) सकाळी ७ वाजल्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरुवात झाली. सकाळी १०.०० वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले होते. यानंतर मतदारांत मोठा उत्साह दिसून आला असून सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी ६१४ पैकी ४०२ (५९%) मतदारांनी हक्क बजावला, ग्रामपंचायत मतदार संघात ४ जागांसाठी ५५३ पैकी ३१० (६०%) मतदारांनी हक्क बजावला, व्यापारी मतदार संघात २ जागांसाठी ७८५ पैकी ४६० (५९%) मतदारांनी हक्क बजावला तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागांसाठी २३३ पैकी १७५ (७५%) मतदारांनी हक्क बजावत जवळपास ६० टक्के मतदान पार पडले.
उर्वरित तीन तासात मतदान करून घेण्यासाठी उमेदवार व त्यांच्या यंत्रणेची पळापळ सुरू आहे.