माजलगाव,दि.३०: येथील माजलगाव बाजार समितीसाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी दुपारी १०.०० वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान शांततेत पार पडले आहे.
माजलगाव बाजार समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून ताकत लावली असून प्रतिष्ठेची केली आहे. आज (दि.२३) सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरुवात झाली. सकाळपासूनच भाजपचे मोहन जगताप, ओमप्रकाश शेटे यांच्यासह कार्यकर्ते, माजी आमदार राधाकृष्ण पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.प्रकाश सोळंके तंबूत तळ ठोकून आहेत.
इतके झाले मतदान
सकाळी १०.०० वाजेपर्यंत सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी ६१४ पैकी २०५ (३४%) मतदारांनी हक्क बजावला, ग्रामपंचायत मतदार संघात ४ जागांसाठी ५५३ पैकी १२३ (२५%) मतदारांनी हक्क बजावला, व्यापारी मतदार संघात २ जागांसाठी ७८५ पैकी २६५ (३३%) मतदारांनी हक्क बजावला तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागांसाठी २३३ पैकी १११ (४७%) मतदारांनी हक्क बजावला. आत्तापर्यंत जवळपास ३० टक्के मतदान पार पडले असून दोन्ही बाजूंनी मतदारांना मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.