आ.प्रकाश सोळंकेचा मोहन जगताप यांच्यावर आरोप; नाईकनवरेना सल्ला तर पाटलाना इशारा …

Spread the love

माजलगाव, दि.२९: मोहन जगताप यांनी त्यांच्या कारखान्यातून गाळप केलेल्या उसाची रिकव्हरी कमी शेतकऱ्याची लुट केली आहे. शेतकरी हित जोपासत असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ असल्याचा हल्लाबोल आ.प्रकाश सोळंके यांनी करत त्यांनी माझ्यावर केलेला घराणेशाहीचा आरोप हा मूर्खपणाचे लक्षण आहे. तर नितीन नाईकनवरे याने त्याच्या बापाला विचारावे मी तुझ्या घरासाठी काय केले ? असा सवाल सल्ला दिला तर माजी आमदार राधाकृष्ण पाटील यांना ही येत्या काळात तुमच्या प्रकरणावर लक्ष घालणार असल्याचा इशारा लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ.प्रकाश सोळंके यांनी आज (शनिवारी) दुपारी ४ वाजता लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात दिला.

या पत्रकार परिषदेला बाबुराव पोटभरे, अशोक डक, कल्याण आबुज, संभाजी शेजुळ, राजेश घोडे, जयदत्त नरवडे, अच्युत लाटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आ.प्रकाश सोळंके म्हणाले, माझा मुलगा (विरेंद्र सोळंके) २० वर्षात मी कुठे उभा केला नाही. त्याने माझी पडीक जमीन चांगली केली. त्यात ३० एक्कर आंबा, ३० एक्कर सीताफळ, ३० एक्कर बांबू लागवड, हरितगृह, रोपवाटिका, शेळी पालन आदी शेती व शेतीशी निगडित व्यवसाय केले आहेत. तसेच उत्पादक कंपन्या, जैविक शेती, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन याबाबत अभ्यास केला. त्यानंतर त्याला केवळ शेती क्षेत्रात काम करण्यासाठी संचालक होयचे आहे. त्याद्वारे तो शेती व शेतकऱ्यांसाठी विकासासाठी काम करणार आहे. तो सभापती, उपसभापती होणार नाही. तसेच खरेदी विक्री संघावर १५ पैकी १५ जागांवर आम्ही विजय मिळवला, वडवणी बाजार समितीवर १८ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आत्ता उद्या ही आम्ही १०० टक्के माजलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

आ.प्रकाश सोळंके यांचे मोहन जगताप यांच्यावर आरोप …

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात संचालक मंडळात मोहन जगताप हे स्वतः, बाप, भाऊ, चुलत भाऊ असे पाच लोक आहेत. त्यांना माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. छत्रपती कारखाना व सोळंके कारखान्याचे कार्यक्षेत्र एक असतांना रिकव्हरीत फरक कसा पडतो. २०२१-२२ मध्ये १०.२६ तर २२-२३ मध्ये ९.७१ एवढा येतो तर आमची रिकव्हरी १०.९२ व १०.९५ एवढी येते. ही तफावत संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. त्यातून शेतकऱ्यांचे १.२४ टक्के रिकव्हारी कमी करून ३८१ रुपये प्रति टन कमी मिळणार आहेत. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाते. त्यांना वेतन आयोग अजून दिला नाही. त्यांना रेकॉर्डवर घेतले गेले नाही. त्यातून एक सिद्ध होते की हा कारखाना शेतकरी व कामगारांच्या हिताचा नसून कर्दनकाळ आहे.

आ.प्रकाश सोळंके यांनी नाईकनवरे यांना फटकारले …

नितीन नाईकनवरे हा पत्र्यात राहत होता. यात काय चूक आहे का ? असा सवाल करत. किसनराव नाईकनवरे यांनी माझ्यासोबत २५ वर्षे काम केले. त्यांच्यात व माझ्यात त्याने दरी निर्माण केली. नादान आहे तो, तुझ्या बहिणीच्या लग्नात, तुझ्या वडिलांचे हार्ट ऑपरेशन वेळी व तुझ्या घरासाठी मी काय केले हे तुझ्या बापाला विचार असे खडे बोल सुनावत नितीन नाईकनवरे यांना फटकारले.

आ.प्रकाश सोळंके यांचा राधाकृष्ण पाटील यांना इशारा …

आण्णाच्या बाबतीत मी एकेरी उल्लेख केला नाही, मी त्यांना आर तूर बोललो नाही. परंतू त्याबाबत चुकीचा प्रसार केला गेला. त्यांची माझे पानिपत करण्याइतपत ताकद आहे किंवा नाही यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांच्या घरण्याबाबत बरीचशी प्रकरण माझ्या हाती लागलेली आहेत. अनेक गुन्हेगारी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची अनेक प्रकारची प्रकरणे आहेत. त्या बाबत मला आज बोलायचं नाही, त्या बाबत मी पुढे पत्रकार परिषद घेऊन बोलेल.

Leave a Reply