Majalgaon शहरात नागरिकात भितीचे वातावरण
माजलगाव, दि.२८ : शहरातील छत्रपती संभाजी नगर, मंगलनाथ कॉलनी येथे चोरट्यांचा पाच ते सात ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रयत्न एकाच रात्री असफल ठरला आहे. यामुळे मात्र नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांनी डोके वर काढत आवाहन उभे केले आहे.

माजलगाव शहरातील विविध भागात मागील काही महिन्यांपूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोऱ्यांचाच तपास पोलिसांना लागलेला नाही. तसेच शहरामध्ये मागील दिड ते दोन महिण्यांपूर्वी एका प्रतिष्ठीत व्यापा-यास हातचलाखीने तर एका ज्येष्ठ नागरिकांस भुरळ घालुन लुटल्याचा प्रकार घडलेला आहे. याचा तपास अद्यापही पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चुन पुन्हा – पुन्हा चो-या करण्याचे धाडस करत आहेत. याचाच प्रत्यय आज (दि.२८) गुरूवारच्या रात्री आला आहे. शहरातील संभाजीनगर भागामध्ये अरणकल्ले यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू असतांना येथील वाचमन जागा झाल्याने चोरटे फरार झाले. तर विनोद बजाज यांच्या बांधकामावर काम करणा-या दोन वाचमनचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले तसेच गंगाधर थावरे, शिक्षक ढिसले यांचेसह पाच ते सात ठिकाणी या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यातील चोरटे सि.सी.टी.व्ही.मध्ये कैद झाले आहेत. दरम्यान चोरट्यांनी विद्युत रोहित्रामधील फ्युज काढले होते व अंधाराचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न केला होता. या चोरींच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये दहशत पसरली आहे.
