वडवणी, दि.२८: येथील प्रतिष्ठेची झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १८ जागेवर आ.प्रकाश सोळंके व माजी आ.केशव आंधळे यांच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलचे विजय मिळवला आहे.
वडवणी बाजार समिती निवडणूक अत्यंत आ.प्रकाश सोळंके, माजी आ.केशव आंधळे, जयसिंग सोळंके यांच्या व राजाभाऊ मुंडे यांनी यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक होईल असे चित्र होते. मात्र आज यासाठी मतदान होऊन मतमोजणी झाली. यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलने १८ पैकी १८ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुरळा उडवला.
विजयी उमेदवार –
सोसायटी मतदार संघ
१) खोटे रोहिदास अश्रुबा २)गरड शिवाजी आनंदराव ३)नाईकवाडे नंदकुमार निवृत्ती, ४) मस्के दिनेश बन्सीधरराव, ५) शेळके प्रदीप राजेंद्र, ६)शिंदे अमरसिंह पंजाबराव, ७) शिंदे संभाजी मुरलीधर, ८) शेख दिलशादबी समशेर,९) शेळके अनुराधा नारायण, १०) चोले अनिल अश्रुबा, ११) शिंदे विश्वनाथ भगवान,
ग्रामपंचायत मतदार संघ
१२) बादाडे अतुल बंडू, १३) लंगडे सचिन सुखदेवराव, १४) मांजरे बबन धुराजी, १५) कदम अभिमान अर्जुन,
व्यापारी मतदार संघ
१६ अंडील पांडुरंग अंबादास, १७) धस रणजीत मधुकर,
हमाल मापाडी मतदार संघ
१८) साळवे भिकाराम धर्मराज.