बीड, दि.२५: शासन परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावर आढावा बैठका घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनुकंपा धारकांच्या प्रश्न तसाच प्रलंबीत राहत आहे. त्याकरिता तात्काळ जिल्हा आढावा बैठका घेण्यात याव्यात, अशी मागणी बीड जिल्ह्यातील अनुकंपा धारकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वेळोवेळी आपणास अनुकंपा आढावा बैठक घेणे संदर्भात निवदने दिलीत, पण अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अनुकंपा विषयी फार उदासिनता दिसून येते. शासन परिपत्रकानूसार दर सहा महिण्यात जिल्हा स्तरावर अनुकंपा आढावा बैठक घेणे अनिवार्य आहे. पण आपला जिल्हा त्याला अपवाद आहे की, काय असा संभ्रम बीड जिल्ह्यातील सर्व अनुकंपा धारकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यात आढावा घेवून ज्या विभागात पदे रिक्त आहेत. पण अनुकंपा प्रतिक्षा यादी नाही, अशा विभागात जिल्हा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची शिफारस करून तात्काळ नियुक्त्या दिल्यात. उदाहरण द्याचे म्हणटले तर आपल्या नजीकच्या लातूर जिल्ह्यात याच वर्षी सामाईक यादीतील जवळपास 40 ते 50 उमदेवारांना जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिकच्या जिल्हाधिकारी यांनी देखील वेळोवेळी आढावा बैठक घेवून नाशिक जिल्हा सामाईक यादीतील जवळपास 270 उमेदवारांना जानेवारी महिण्यात नियुक्त्या दिल्या.
आमच्या घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील अनुकंपा धारकांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांची भेट घेऊन कैफियत मांडत. तात्काळ आढावा बैठक घेऊन अनुकंपा धारकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करत निवेदन दिले.
जाहिरात…

