माजलगाव शहरातील त्या वादग्रस्त सर्व्हे नंबरची मोजणी सुरू

Spread the love

कागदावरील शासकीय जमीन खुली होण्याची जनतेची अपेक्षा

माजलगाव, दि.२४: शहरातील बायपास रोड (आझाद चौक) परिसरातील सर्व्हे नं. ३७०, ३७१, ३७२ या वादग्रस्त सर्व्हे नंबरची शासकीय मोजणीस अखेर भूमिअभिलेख कार्यालयाकडून आज (दि.२४) सोमवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. या सर्व्हे नुंबरमध्ये शासनाची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन असून त्यातील केवळ ३७ गुंठे जमीन ताब्यात आहे, तर उर्वरित १३ एक्कर जमिन अनेक भूमाफियांनी गिळकृत केलेली आहे.

या तीनही सर्वे बाबत मागील १०-१२ वर्षात वादग्रस्त असून खाजगी मोजण्यांमध्ये कुठलेही क्षेत्र कुठेही काढल्या जावुन येथे असणा-या शासनाच्या जमीनीला देखील धक्का पोहचवला आहे. नगर परिषदेने वारंवार मागणी करुनही भुमिअभिलेख कार्यालयाकडुन टाळाटाळ होणारी शासकिय मोजणी अखेर आज (दि.२४) सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. या मोजनिमधून हेराफेरी करणाऱ्यांचे पाप समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत.

१३ एक्कर ३४ गुंठे पैकी शासनाची १ एक्करच जमिन ताब्यात

सर्व्हे नंबर ३७०, ३७१, ३७२ मध्ये शासन व माजलगाव नगर परिषदची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन आहे. त्यापैकी सर्व्हे नं.३७२ मध्येच केवळ ३७ गुंठे नगर परिषदच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते तर उर्वरित १२ एक्कर ३७ गुंठे जमीन गायब आहे.

अशी आहे सर्व्हे नं. प्रमाणे शासकीय जमीन

सर्व्हे नं. ३७० मध्ये ४ एक्कर आहे, त्यात केवळ ३७ गुंठे जमीन नगर परिषदेच्या ताब्यात आहे. त्यातील १ एक्कर ३ गुंठे जमीन गायब आहे. सर्व्हे नं.३७१ मध्ये ७ एक्कर ३४ गुंठे व सर्व्हे नं.३७१ मध्ये २ एक्कर ही जमीन गायब आहे.

Leave a Reply