भाजपचे जगताप यांनी दिली काटे की लढत !
माजलगाव, दि.२३: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजलगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ जागेवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवत २० वर्षापासून असलेले एकहाती वर्चस्व कायम राखले. तर भाजपच्या मोहन जगताप यांच्या पॅनलने काटे की टक्कर देत … जोरदार लढत देऊन सत्ताधाऱ्यांना पळताभुई थोडी केली होती.
माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या खरेदी विक्री संघ व बाजार समितीच्या निवडणुकात आ.प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व हटवण्यासाठी भाजपचे मोहन जगताप यांनी आवाहन दिले होते. त्यातील खरेदी विक्री संघाच्या १५ जागेसाठी आज सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यात संस्था मतदार संघात ४७ पैकी ४६ मतदान झाले तर वयक्तिक मतदार संघामध्ये १२२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
यानंतर दुपारी ५ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये संस्था मतदार संघात ७ पैकी ७, महिला प्रतिनिधी २, वयक्तिक मतदार संघ ३, विजा/भजा १, इतर मागासवर्गीय १, अनुसूचित जाती जमाती १ अशा १५ च्या १५ जागेवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवला.
आ. सोळंकेनी गाडीभरून आणलेली मते फुटली
आमदार प्रकाश सोळंके यांनी दगाफटका नको यामुळे संस्था मतदार संघातील जवळपास ३३ मतदारांना आदल्या दिवशी ताब्यात घेतले होते. त्यांना थेट मतदानासाठी सकाळी ११ वाजता मतदान केंद्रावर मोठ्या लवाजम्यासह आणले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवारांना २६ ते २७ अशी मते पडल्याने, त्यांची ७ ते आठ मते फुटली असल्याची चर्चा होती. त्यामुळे पुढे होणाऱ्या बाजार समिती निवडणुकीत त्यांना सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. तर मोहन जगताप यांचा मात्र आत्मविश्वास वाढला आहे.
आ.सोळंकेचे विजयी उमेदवार …
संस्था मतदार संघातील उमेदवार
शहाजी वामनराव कोलते
शेख जमीर शेख आमिन
बंडू सोपानराव सोळंके
तुकाराम सदाशिव चाळक
भालचंद्र पाठक
संगीता बळीराम बादाडे
शिंदे सत्यनारायण वसंतराव
महिला प्रतिनिधी मतदार संघ
जाधव निता ज्ञानेश्वर
तांगडे सुभाद्राबई दत्तात्रय
वयक्तिक मतदार संघ
गरड हरिभाऊ मुंजाजी
रांजवन लालासाहेब हरीभाऊ
शेजुळ श्रीकृष्ण सुधाकर
विजा/भजा मतदार संघ
हुबाले आसाराम गंगाधर
इतर मागासवर्गीय मतदार संघ
गोबरे वैजेनाथ सुभाषराव
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
खंडागळे बबन जिजा