माजलगाव खरेदी विक्री संघ निवडणूक; आ.सोळंकेच्या पॅनलचा ७ जागावर विजय

Spread the love

वयक्तिक मतदार संघाची मतमोजणी सुरू

माजलगाव, दि.२३: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजलगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या संस्था मतदार संघातील ७ पैकी ७ जागावर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवत भाजपचे जगताप, आडसकर यांना धक्का दिला आहे. तर ८ जगाची मतमोजणी सुरू आहे.

खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या १५ जागा असून ७ जगाचा निकाल हाती आला आहे. त्यात संस्था मतदार संघातील ७ पैकी ७ ही जागेवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवला आहे. तर उर्वरित महिला प्रतिनिधी मतदार संघातील २ व वयक्तिक मतदार संघातील ६ अशा ८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

आ.सोळंकेचे विजयी उमेदवार …
शहाजी वामनराव कोलते
शेख जमीर शेख आमिन
बंडू सोपानराव सोळंके
तुकाराम सदाशिव चाळक
भालचंद्र पाठक
संगीता बळीराम बादाडे
शिंदे सत्यनारायण वसंतराव

संस्था मतदार संघात भाजपने जगताप, आडसकर यांनी चांगलीच टक्कर आ.प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. त्यांचे उमेदवार ५ ते ६ मतांनी पराभूत झाले आहेत.

Leave a Reply