IPS डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाची कारवाई
बीड, दि.२२: शहरातील चांदणी चौक, कंकालेश्वर मंदिर रोड व शाहू नगर येथून दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करत, चार आरोपींना ताब्यात घेतल्याची कारवाई केली. ही कारवाई आज (शनिवारी) IPS डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, IPS डॉ.धीरज कुमार यांना बीड येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाबत हलचाल होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने शनिवारी पहाटे ३ वाजता पासून सापळा सापळा रचला. त्यानुसार त्यांना चांदणी चौक, कंकालेश्वर मंदिर रोड व शाहू नगर बीड गैरकायदेशिर दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काढतुस जप्त केली. तसेच आरोपी अक्षय व्यंकटराव लाड (वय २३ वर्ष) रा. विद्यानगर पूर्व बीड, विजय निवृत्ती सुतार (वय २४ वर्ष) रा.गेवराई ह.मु. शाहू नगर बीड, कार्तिक संतोष वाघमारे (वय १९ वर्ष) रा.सुभाष कॉलनी पेठ बीड, वैभव रामेश्वर पवार (वय २१ वर्ष) रा.रविवार पेठ बीड या चार आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई ही कारवाई IPS डॉ.धीरज कुमार यांच्या पथकातील पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे, गणेश नवले, संतराम थापडे तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाथरकर, पोलीस कर्मचारी चव्हाण, सारनीकर, आगलावे यांनी केली.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून वरील चार जनाविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, सह कलम ३४ भादवी मा.जिल्हाधिकारी बीड यांचे जा.क्र.२०२३ गृह विभाग/पर.कार्यवाही/१/१/मपोका/१९५१ दिनांक १०/०४/२०२३ अन्वये मनाई आदेश लागू असल्याने सह कलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.