उद्या माजलगाव खरेदी विक्री संघासाठी मतदान

Spread the love

निकालाचा बाजार समिती निवडणुकीवर होणार परिणाम

माजलगाव, दि.२२: येथील खरेदी विक्री संघच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या दि.२३ रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संचालक मंडळासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

माजलगाव तालुका खरेदी विक्री संघावर आ.प्रकाश सोळंके यांचे दोन दशकांपासून वर्चस्व आहे. या होऊ घातलेल्या निवडणुकीत आ.सोळंके यांचे वर्चस्व उध्वस्त करण्यासाठी पॅनल उभे करून भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी आव्हान दिले आहे. संस्था मतदार संघाच्या ७ जागा, वयक्तिक मतदार संघाच्या ३ जागा, महीला प्रतिनिधी मतदार संघाच्या २ जागा, विजा, भज किंवा विमाप्र मतदार संघाची १ जागा, इतर मागासवर्गिय मतदार संघची १ जागा, अनुसुचित जाती जमाती मतदार संघाची १ जागा अशा संचालक मंडळाच्या १८ जागाच्या निवडणुकीसाठी ३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यासाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. तर उद्या दि.२३ रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वा. दरम्यान मतदान प्रक्रिया शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पर पडणार आहे. तसेच उद्याच मतदान प्रक्रिया पर पडताच मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या विजयाचा निकालाचा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणुकीवर होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आ.सोळंके व भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी ताकद लावली आहे.

Leave a Reply