माजलगावकरासाठी आनंदाची बातमी; दोन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Spread the love

माजलगाव, दि.२२: माजलगाव कारसाठी आनंदाची बातमी असून शहरातील तरुण क्रिकेट अकॅडमीच्या प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड या दोन खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या गोवा गोल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संघात निवड झाली आहे.

नॅशनल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दि २५ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान गोवा येथे गोवा गोल्ड कप होणार आहे. या संघात महाराष्ट्र संघाने सहभाग घेतला असुन माजलगावचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड यांची टि-२० क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संघात निवड झालेली आहे. या दोघांनीही जिद्द व चिकाटीच्या बळावर स्थानिक स्पर्धेत नावलौकीक मिळवलेले आहे. दोघेही ऑल राऊंडर क्रिकेटर म्हणुन ओळखले जातात. हे दोघेही तरूण क्रिकेट अ‍ॅकॅडमी, माजलगाव येथे प्रशिक्षण घेत असुन त्यांना शेख फेरोज सर, गोविंद टाकणखार, विनोद कोमटवार, मिरवाज खाँ, पेंटर भगवान, घायतिडक, शेख हाय्युम भाई, यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. गोवा येथे होणार्‍या स्पर्धेत महाराष्ट्राकडुन दोघेही प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही माजलगावकरांसाठी आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. शेटे व गायकवाड यांच्या या यशाबद्दल दोघांचेही सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply