आ.प्रकाश सोळंकेवर जगताप – नाईकनवरे यांचा हल्लाबोल !

Spread the love

माजलगाव बाजार समिती निवडणुकीचे वातावरण तापले ..

माजलगाव, दि.२१: येथील बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडू लागल्या आहेत. मोहन जगताप यांनी आ.सोळंकेनी स्वतः च्या पुत्रासाठी सामान्य कार्यकर्त्याचा बळी दिल्याचा आरोप केला तर नितीन नाईकनवरे यांनी तुमच्या घरातील कुत्रे – मांजराला पदे द्यायची राहिल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे.

उन्हाळ्याच्या तापमान जसे वाढले आहे तसे आत्ता माजलगाव बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने तापमान वाढू लागले आहे. काल गुरुवारी आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन जगताप, नाईकनवरे यांच्यावर आरोप केले होते. त्यास प्रतिउत्तर म्हणून आज (दि.२१) शुक्रवारी भाजप कार्यालय ( मोहनदादा जगताप जनसंपर्क) येथे दुपारी १२ वाजता भाजपा नेते मोहन जगताप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नितीन नाईकनवरे, श्रीकृष्ण सोळंके, संतोष यादव, भास्कर कचरे, राहुल जगताप, जगदीश बादाडे, नितीन काळे आदी उपस्थित होते.

मोहन जगताप म्हणाले, आ.प्रकाश सोळंके हिंमत असेल तर मैदानात या म्हणू लागले, हो आत्ता आलोत मैदानात. माझ्या कुटुंबातील यात कुणी उमेदवार नाही, माझ्या जीवा भावाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मी लढत आहे. परंतू सोळंके स्वतः च्या मुलाला सभापती करण्यासाठी उठाठेव करत आहेत. सोसायटी, ग्रामपंचायत निवडणूक न लढता, सामान्य कार्यकर्त्याच्या मानगुटीवर पाय देऊन राजीनामा देण्यास भाग पाडून स्वतः च्या मुलाला सदस्य केले. त्यातून निवडणूक लढवत सभापती होण्याची आशा बाळगत आहेत. त्यांनी यापुढे चुकीचे आरोप करू नये, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जगताप यांनी दिला.

नितीन नाईकनवरे यांनी आ.सोळंकेवर प्रथमच हल्लाबोल करत, तुमच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य, भाऊ कारखान्यावर, पुतण्या जिल्हा परिषद सदस्य, आत्ता पोरगा सभापती करायचा. आत्ता तुमच्या कुटुंबातील केवळ कुत्र, मांजराला पदावर बसवायचे राहिले आहे. पाच वर्षात बाजार समितीत एक विकासाचे काम केलेले दाखवावे. मी घर बांधले म्हणतात.. का ? गरीब कार्यकर्त्याने घर बंधु नये? तुम्ही डीआय फिरत होतात, आत्ता फोर्चूनर गाडीत फिरत. आत्ता पर्यंत तुम्ही आरोप करत राहिलात, आम्ही आयकत राहिलो. परंतू यापुढे हे चालणार नाही … यापुढे करारा जवाब दिया जायेगा असा इशारा नाईकनवरे यांनी आ.सोळंके यांनी दिला.

काम करणाऱ्याला लाथ, मापात पाप करणाऱ्याला साथ …

माजलगाव बाजार समितीमध्ये विद्यमान सभापती संभाजी शेजुळ यांनी चांगले काम केले म्हणता. मात्र ज्यांनी चांगले काम केले त्यांना आ.सोळंके यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र ज्यांनी तुर, हरभरा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक केली. कुंटलमागे ५०० रुपये हाणले, मापात पाप करणारांना संधी दिली, असा ही हल्ला नाव न घेता अशोक डक यांच्यावर जगताप – नाईकनवरे यांनी आरोप केला.

Leave a Reply