-
पोस्को कायद्यांतर्गत शहर ठाण्यात गुन्हा दाखल
माजलगाव, दि.१०: शहरातील सिध्देश्वर संकुल परिसरात अल्पवयीन मुलीची छेड कडून विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. यावेळी आरोपीस जमावाने चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. यावर आरोपी विरुद्ध माजलगाव शहर पोलिसात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव शहरातील इंदिरा नगर येथील जफर रहिमोद्दिन इनामदार (वय २९) हा मागील तीन – चार महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. त्यातच शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सिध्देश्वर संकुल परिसरात छेड काढत विनयभंग केला. यावेळी जमावाने आरोपीस चोप देत माजलगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, कलम ३५४, अट्रोसिटी नुसार आरोपी जफर रहिमोद्दीन इनामदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपअधीक्षक करत आहेत.
