‘ह्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध

Spread the love
  • निवडणूक विभागाची औपचारिक घोषणा बाकी

माजलगाव,७: तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या निवडणूक पहिल्या टप्यात पार पडत आहेत. जनतेतून सरपंच निवड असल्याने निवडणुकात मोठी रंगत आलेली आहे. मात्र अपवाद ठरत सभाव्या वाद व गावच्या एकोप्यासाठी ४ ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी आदर्श पाऊल उचलत सरपंच पदासह सदस्य च्या निवडी बिनविरोध पार पाडल्या. यावर आत्ता केवळ निवडणूक विभागाकडून घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ४४ ग्रामपंचायत पैकी तालुक्यातील छत्र बोरगाव, रेणापूरी, गव्हाणथडी फुलपिंपळगाव या ग्रापमंचायातच्या सरपंच पदासाह सदस्यांच्या निवडी ह्या एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध पार पडत आहेत. यात केवळ आत्ता निवडणूक विभाकडून औपचारिक घोषणा उरली आहे. तर ४० ग्रामपंचायतसाठी निवडणुका पार पडणार आहेत.

  • बिनविरोध सरपंच व सदस्य :-

  • फुलपिंपळगाव ग्रामपंचायत –
  • सरपंचपदी चंद्रकांत सिताराम धोंडगे तर सदस्य करिता रमा अनिल चाळक, सौ.सुभद्रा वसंत मते, सगुणा श्रीकृष्ण मते, सौ.अन्नपूर्णा चंद्रकांत धोंडगे, इंदुबाई विठ्ठल हातागळे, अशोक आदिनाथ घाटुळ, केशव आत्माराम मते.
  • रेणापूरी ग्रामपंचायत –

  • सरपंचपदी विमल किसनराव नाईकनवरे तर सदस्य करिता नितीन किसनराव नाईकनवरे, राम उद्धवराव चोरगे, सौ.रोहिणी भिवराज नाईकनवरे, सौ.अनुराधा अशोक नाईकनवरे, सौ.कोमल राजाभाऊ पांचाळ, भीमा राजाराम घडसे, सौ.सीताबाई श्रीपती घडसिंगे.
  • छत्र बोरगाव ग्रामपंचायत –

  • सरपंचपदी अशोक बाबुराव सोळंके तर सदस्य करिता गोपाळ राजेभाऊ जाधव, शंकर परसराम जाधव, शितल सचिन निसर्गध, रत्नमाला आसाराम गायके, संजय रामभाऊ कदम, सौ.जानवी रमेश जाधव, दत्तात्रय बाबुराव लेंगुळे, श्रीराम ज्ञानोबा शेवाळे, सौ.अर्चना छगन जाधव.
  • गव्हाणथडी ग्रामपंचायत –

    सरपंचपदी सुकन्या लहू नेहरकर तर सदस्य करिता सौ.अनुसया गोविंद चौरे, सौ. ज्योती सिद्धेश्वर पाटेकर, सौ. सुमन पांडुरंग चौरे, सौ. लक्ष्मीबाई हरिभाऊ पाटेकर, श्री. दिनकर कल्याण मुंडे, श्री. कृष्णा नवनाथ नेहरकर, श्री. सर्जेराव सुदाम जायभाये.

Leave a Reply