माजलगाव, दि.२०: आ.प्रकाश सोळंके यांनी धाडसी निर्णय घेत चक्क बाजार समितीच्या निवडणुकीतून विद्यमान सभापती व उपसभापती यांची उमेदवारी कापली आहे. यामुळे जरी नवख्या चेहऱ्यांना संधी दिली असली तरी विद्यमान पदाधिकारी नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

येथील बाजार समितीच्या निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके यांच्या समोर भाजपाकडून मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी चांगलेच आव्हाहन दिले आहे. त्यात आ.सोळंके यांनी त्यांचे पुत्र विरेंद्र सोळंके यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. ही निवडणूक त्यांना वर्चस्व कायम राखत पुत्राचे यशस्वी राजकारणात प्रवेश होण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातच आज (दि.२०) गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी माघार घेण्यासाठी अनेकांची मनधरणी सुरू आहे. आ.सोळंके यांनी तर धाडसी निर्णय घेत चक्क विद्यमान सभापती संभाजी शेजुळ व उपसभापती लता अच्युत लाटे यांना माघार घेण्यास लाऊन निवडणुकीत एक प्रकारे डावलले आहे. यात आ.सोळंकेचा धाडसी निर्णय जरी वाटत असला तरी विद्यमान पदाधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्त होत असल्याचे संभाव्य धोका ओढवला आहे.
