-
चार जनाविरुद्ध माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल
माजलगाव, दि.18: शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हिंदु – मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर छापलेले बॅनर अखेर पोलीसांनी हटवले आहे. तसेच याप्रकरणी चार जनाविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दि.18 मंगळवारी सकाळी 9 वा. दरम्यान हिंदु – मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा. हिंदुधर्मियांबाबत व्देष पसरवनारा व त्यांना शिव्या देणारा पोस्टर लावले होते. त्या बॅनर (पोस्टर) वर उत्तर प्रदेश येथील 1. आतीक अहमद 2. अशरफ अहमद यांच्या मृत्यु संदर्भान त्याचे समर्थन करुण त्यांच्या मृत्यु बाबत निषेध व्यक्त केला होता. तसेच एका वृत्त पत्राचे बातमीचे कात्रण ज्या मध्ये आतिक अहमद व अशरफ अहमद यांच्या मृत्यु बाबत मर्डर ऑफ आतिक, डेथ ऑफ डेमोक्रसी ते हिंदुना गांडू आहेत अशी बातमी, व पिंजेरेमे बंद शेर का शिकार किया है., कभी खुले शेर को शिकार करना, तुम्हारी नस्ले तबाह हो जाएंगी ईशाअल्लाह, तसेच किसकी थी ईतनी हिंमत्त जो छेडता उस दिलेर को यार गर्दीश मे तो मार देते है कुत्ते भी शेर को … अशा प्रकारचे बँनर व खाली मोहसिन भैय्या पटेल मित्रमंडळ असे लिहिलेला अंदाजे 15*10 आकाराचा बॅनर होते.
या विरोधात हिंदु संघटना आक्रमक झाल्या असल्याने पोलीस प्रशासनाने तात्काळ बॅनर हटवत वादग्रस्त बॅनर लावण्या प्रकरणी नसिर आब्दुल शेख (रा. बिलाल मोहल्ला माजलगाव), शेख वाजेद शेख युनुस (रा.बिलाल मोहल्ला,माजलगाव), सुमेर सिद्दीकी (रा.सिद्दीकी कॉलनी, माजलगाव) व मोहसिन युनुस पटेल (रा.राज गल्ली,माजलगाव) यांच्या विरूद्ध पोलीस शिपाई शाहू मंदे यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 153 (अ), 188, 294, 295,298, 505 (2), 34 गुन्हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
