मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा संशय

Spread the love

तालुक्यातील नित्रुड येथील घटना

माजलगाव, दि.१८: १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नित्रुड येथे घडली आहे. गुलाम मोहंमद मुर्तुजा शेख असे नाव आहे. याबाबत मात्र नातेवाईकाने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील वेदांत बिअरबार च्या पाठीमागील शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गुलाब मोहंमद मुर्तूजा शेखचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (मंगळवारी) सकाळी ९ वाजण्याच्या आढळला. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिंद्रुड पोलिसांना कळवली. यावर गुलाब चा मृतदेह हा माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता आणण्यात आले आहे. गुलाम हा रोजा (उपवासात) होता. तसेच त्याने आत्महत्या केलेली नसून तो घातपात असल्याचा संशय नातेवाईकाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply