महावितरणमध्ये देखभाल दुरुस्ती कामात लाखोंचा भ्रष्टाचार !

Spread the love

प्रहार संघटनेचे महावितरणच्या कार्यालयावर आमरण उपोषण सुरू

माजलगाव, दि.१७: येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत माजलगाव तालुक्यातील झालेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आज उपोषण सुरू केले आहे.

माजलगाव तालुक्यात २०२०-२०२२ पर्यंत देखभाल दुरुस्तीचे लाखो रुपये बिले काढण्यात आली आहेत. वास्तविक पाहता शेतकरीच तो सर्व खर्च करत आहेत. त्यात प्रामुख्याने डी.पी. (विज रोहीत्र) जळाले असेल ते स्वतः पैसे खर्चून दुरुस्त करणे. ऑईल नसेल, फ्यूज किट, केबल हे सर्व प्रकारचे काम शेतकरी बांधव करतात. मात्र हेच कामे दाखवुन महावितरणकडुन एजन्सीला हाताशी धरून लाखो रुपयांची बोगस बीले काढली गेली आहेत. ही बाब माहीती अधिकारातून उघडकीस आलेली आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चौकशीची मागणी केली होती. मात्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून निवेदनाची दखल न घेतल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गोपाळ पैंजणे, अशोक अर्जुन, भारत डोंगरे, मुस्ताक कुरेशी, अविनाश ढगे, रामेश्वर कलापुरे, गणेश शिंदे आदींनी माजलगाव महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आज (दि.१७) सोमवारी अमरण उपोषणास सुरू केले आहे.

Leave a Reply