रामनवमी,डॉ.आंबेडकर जयंतीत डीजे वाजवले; अकरा जनावर गुन्हे दाखल

Spread the love

माजलगाव, दि.१६: माजलगाव शहरात रामनवमी आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये विनापरवाना डीजे वाजवण्यात आले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात राम नवमीला वाजवणाऱ्या एका डीजेच्या विरोधात तर डॉ.आंबेडकर यांच्या जयंती मध्ये विनापरवाना डीजे वाजवणाऱ्या दहा अशा अकरा डिजे चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, माजलगावात दि.३० मार्च २०२३ रोजी रामनवमी निमित्त मिरवणुकीमध्ये विनापरवाना डीजे वाजवणाऱ्या डीजे मालक बाळासाहेब साहेबा जाधव रा.बीड व दि.१४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये विना परवाना डिजे वाजवण्यात आले. याप्रकरणी डीजे वाजवणारे डीजे मालक सुनील विक्रम अलजेंडे रा.पंचशिल नगर, गणेश सूर्यकांत निपटे रा.पिंपरखेड, रोहित प्रकाश सोनवणे रा.श्रीरामपुर, किशोर भाऊसाहेब लाड रा.जालना, अशोक भास्कर खरमाटे रा.तिनतरवणी, अक्षय टाकणखार रा.माजलगाव, शंकर रणदिवे रा.माऊली फाटा, जोगेंद्र गोरे रा. बीड, ज्ञानेश्वर जोगदंड रा. कळम, ज्ञानेश्वर विघ्ने रा. ब्रह्मगाव या दहा जणाविरुद्ध अशा एकूण ११ डीजे वाजवणाऱ्या विरोधात माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शाहू दत्ता मंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कार्यवाहीमुळे डीजे वाजवणाऱ्या मध्ये खळबळ उडाली असून यापुढे परवाना घेणे आवश्यक झाले आहे.

Leave a Reply