Majalgaon; डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Spread the love

मुस्लिम युवकाकडून खिचडी, पाणी वाटप

माजलगाव, दि.१४: शहरात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती मिरवणूक मुख्य चौकात येताच पाऊसाचे धारा चालू अन् आंबेडकर प्रेमिंच्या उत्साहात आणखी भर पडून जय भीमच्या नारा देत उत्साह द्विगुणित झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत साजरी व्हावी याकरिता IPS डॉ. धीरज कुमार यांनी सकाळ पासूनच जयंती समित्यांना भेट देऊन डॉ.बाबासाहेबाना अभिवादन करत शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. जयंती मिरवणूक या शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पाटील गल्ली, जय भीम नगर, गौतम नगर, भीम नगर, पंचशील नगर, अशोक नगर, इंदिरा नगर, फुले नगर आदी भागातून निघाल्या. तसेच महापुरुष जयंती उत्सव समितीकडून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी येताच विजाचा कडकडाट अन् पाऊसाचे हलख्या सरी कोसळू लागल्या. यामुळे काही प्रमाणात गर्मी कमी झाली मात्र जयंती उत्साव समितीच्या कार्यकर्त्यात जोष संचरत जय भीम च्या नारा देत शहर दणाणून सोडले. यामध्ये तरुणांसह महिलांची मोठी उपस्थिती होती.
जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता.

मुस्लिम युवकाकडून खिचडी, पाणी वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर होता. यावेळी सामाजिक एकोपा जोपासत अल्प आहार म्हणून अशोक लांडगे, शेख आसेफ यांच्यासह आझाद नगर, गौतम नगर येथील युवकाच्या वतीने खिचडीची व्यवस्था केली होती. तसेच मुस्लिम युवकांच्या वतीने बिसलेरी पाणी बॉटलचे वाटप करत तहान भागवली.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाकडून मानवंदना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना देण्यात आली.

Leave a Reply