झटपट बातमी –
बीड : भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर आज (गुरुवारी) जीएसटी ( GST ) पथकाने सकाळपासून कारखान्यात छापा मारून तपासणी करत आहे. जीसटी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी पांगरी (परळी) येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला. तो त्यांनी सक्षमपणे चालवून कारखाना आशिया खंडात यशस्वी कारखाना म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळवला होता. मात्र त्यांच्या पश्चात भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कारखान्याची सुत्रे हाती घेतली. त्या काळापासून कायम हा कारखाना आर्थिक अडचनीसह वेगवेगळ्या कारणाने कायम वादात आहे. त्यातच आज (दि.१३) गुरुवारी सकाळीच वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी (GST) विभागाने छापा टाकून झाडाझडती सुरू केली. केंद्राचा जीएसटी (GST) चुकविल्याचा आरोप असून त्यामुळेच छापा टाकला असल्याचे कळते.