माजलगावची औद्योगिक वसाहतमध्ये उद्योजकापुढे समस्यांचा डोंगर

Spread the love

मुलभुत सुविधा पुरवण्यासाठी उद्योजकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

माजलगाव, दि.१२: येथील औद्योगिक वसाहत येथे वेगाने उद्योग उभारले जात आहेत. मात्र या ठिकाणी उद्योगासाठी पाणी, वीज या सुविधांची वानवा असल्याने उद्योग उभारणीस अडचणी निर्माण होत आहेत. त्याकरिता तात्काळ पाणी, वीज आदी समस्या मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी उद्योजकांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माजलगाव येथे साधारण पाचशे एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत शासनाने मंजुर केली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्याजेकांनी उद्योग उभारावेत व बाहेरून मोठ्या कंपन्यांनी येऊन उद्योग उभारावेत यासाठी शासन, प्रशासन उदासिन दिसत आहे. वास्तविक पाहता बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी माजलगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ – मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असुन येणा-या उद्योगांना संरक्षण देणे ही त्यांची जबाबदारी आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे परंतु दुर्देवाने असे होत नाही. शासनाने औद्योगिक वसाहत मंजुर करत करोडो रूपयांचा मावेजा शेतक-यांना दिला आहे. जे जे उद्योग आज उभारले जात आहेत त्या सा-या उद्योजकांना विजेचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तसेच माजलगाव धरण जवळच असुनही या औद्योगिक वसाहतीला पाणी मिळत नाही. या तसेच रस्ते ही काही ठिकाणी खराब स्थितीत आहेत. त्याकरिता रस्ते, पाणी व विज स्वतंत्र १३२ केव्ही विजकेंद्र तात्काळ मंजुर करून देण्यात यावी. स्वतंत्र पोलीस चौकी, अंतर्गत रस्ते आदी प्रश्न मार्गी लावण्यात यावेत. जेणे करून हजारो सुशिक्षीत बेरोजगारीच्या हाताला काम मिळणार मिळेल, अशी मागणी उद्योजक गोविंद बजाज, राहुल जगताप, बाळकिसन तापडीया, दत्तप्रसाद तापडीया, दिनकर शिंदे यांचेसह अनेक उद्योजकांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply