माजलगावातील जीवनश्री पतसंस्थेकडून ठेवीदाराची फसवणूक !

Spread the love

अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिवासह चौघांवर गुन्हा दाखल

माजलगाव, दि.२: ठेवीदारास विश्वासात घेऊन ठेवीची रक्कम पतसंस्थेत ठेऊन. त्या रक्कमेची मुदत संपून ही न दिल्याने माजलगाव येथील जीवनश्री पतसंस्थेकडून फसवणूक झाल्या प्रकारणी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवासह चौघावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील केसापुरी कॅम्प येथील सेवानिवृत्त ज्ञानोबा पांडुरंग वाघमारे यांच्या सह साक्षीदारास विश्वासात घेऊन जीवनश्री नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनी ज्ञानोबा पांडुरंग वाघमारे ३ लाख, राहुल दशरथ पोटभरे ९५६००, कलावती दशरथ पोटभरे ३ लाख, शिवाजी नाथाजी गायकवाड ६ लाख, चेतन शिवाजी गायकवाड २ लाख, रुपाताई महादेव फुलवरे ४ लाख असे त्यांच्या कडून १८ लाख ९५ हजार ६०० रूपये ‌ठेव म्हणून घेतली. त्याच्या रीतसर ठेव पावत्या ही दिल्या. मात्र सादर मुदत संपून ही रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानोबा वाघमारे यांच्या फिर्यादीवरून रमेश प्रभाकर जाधव , वैजंताबाई रमेश जाधव , प्रभाकर विठ्ठल जाधव, प्रविण लालासाहेब ओव्हळ यांच्या विरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात कलम ४२०,४१७,४०९,४०६ भादवीसह कलम ३,४ एमपिआयडी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाटे करत आहेत.

Leave a Reply