बीड जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान झाले खात्यावर जमा

Spread the love

शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

बीड, दि.१: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०१४-१५ चे ठिबक सिंचनचे अनुदान शासनाच्या व प्रशासनाच्या तांत्रिक चुकीमुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित होते. ही बाब माजलगाव शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सतत पाठपुरावा करून बीड जिल्ह्यातील त्या ५०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.

सन २०१४-१५ चे ठिबक सिंचन अनुदान थकले होते. ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे भाई परमेश्वर डाके यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परंतु जिल्हा कृषी अधिकारी यांनी ही बाब आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांचे सन २०१४-२०१५ सालचे ठिबक सिंचनचे थकीत अनुदान मिळवून दिल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून बिड जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांचे मागील ८ वर्षांपासून प्रलंबित असलेले ठिबक सिंचन अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाले. यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्यासह भाई अँड.नारायण गोले पाटील, भाई परमेश्वर डाके यांचे शेतकरी आभार व्यक्त करत आहेत. शेतकरी कमगार पक्षाच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना 8 वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर यश मिळाले आहे.

Leave a Reply