कापसाला भाव नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख
माजलगाव, दि.१: तालुक्यातील देपेगाव येथील शेतकऱ्यांने कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांना सततचा तागड्याला कंटाळून लिंबाच्या झाडांला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) घडली. विठ्ठल गणेशराव काळे (वय ५२ वर्षे) असे शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे ह्यांना ३.५ एक्कर शेती आहे. शेतीवरच त्यांचा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यात घरात कापूस पडलेली आहे. त्यास भाव नसल्याने व पतसंस्था व खाजगी सावकारांच्या सततच्या तगड्याला विठ्ठल काळे हे मानसिक तणावात होते. त्यातच त्यांनी आज दि.१ शनिवारी सकाळी त्यांच्या भावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला आत्महत्या केली. याची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बोडके, पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी विठ्ठल काळे यांच्या खिशात चिट्टी आढळली. त्यात कापसाला भाव नसल्याचे व पतसंस्था व खाजगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले असल्याचे कळते. सदरील शेतकऱ्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.