एकही अर्ज अवैध नाही !
झटपट बातमी :-
माजलगाव, दि.२७ : येथील खरेदी विक्री संघाची निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दि. २४ मार्च पर्यंत पंधरा जागेसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर आज (सोमवारी) छाननी मध्ये एक ही अर्ज अवैध ठरला नसून ५९ अर्ज वैद्य ठरले.
माजलगाव खरेदी विक्री संघाचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जोरदार मोर्चेबांधणी केली जात. माजलगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकतील आज दि.२७ सोमवारी नामनिर्देशन पत्र छाननी होती. या सुनावणीत आक्षेप न आल्याने ५९ अर्ज ही वैद्य झाले. त्यामुळे १५ जागेसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याने आत्ता दि.२८ मार्च ते ११ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेणे असल्याने कोणते उमेदवार अर्ज मागे घेतात. प्रत्यक्ष निवडणुकीत कोण कोण नशीब आजमावतात
याकडे लक्ष लागले आहे. तसेच दि.१२ एप्रिल २०२३ रोजी अंतिम यादी जाहीर होऊन उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. दि.२३ एप्रिल २०२३ – मतदान व मतमोजणी होणार आहे.
मागील अनेक वर्षापासून खरेदी विक्री संघावर आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या आ.सोलांकेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे मोहन जगताप यांनी चागलीच कंबर कसली आहे.
– – – – – – – – – – – –
असे आहेत मतदार संघ
खरेदी विक्री मध्ये १५ जागा आहेत. त्यात संस्था मतदार संघ ७ जागा १९ उमेदवार, वैयक्तिक मतदार संघ ३ जागा १९ अर्ज, महिलांसाठी २ जागा ८ अर्ज, व्हिजेएनटी १ जागा ६ अर्ज, ओबीसी १ जागा ५ अर्ज,अनु.जाती १ जागा ४ अर्ज.