Majalgaon महावितरण – नगर पालिकेत वसुलीवरून संघर्ष

Spread the love

महावितरणने पाणीपुरवठ्याची वीज तोडली; तर पालिकेने कार्यालयाला ठोकले सिल !

माजलगाव, दि.२८: महावितरण कार्यालयाकडून वीज बील वसुली जोमात सुरू आहे. त्यानुसारच माजलगाव नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वाटर फिलटरचे वीज कनेक्शन तोडले तर खवळलेल्या माजलगाव नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अविनाश निळेकर यांनी वसुलीचा बडगा उगारत महावितरणच्या कार्यालयाला ही सिल ठोकले. पालिका व महवितरनचे वसुली नाट्य शहरवासीयांना पाहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मार्च महिना असल्याने सर्वच कार्यालयाकडून वसुली मोहीम राबवली जाते. त्याच अनुषंगाने महावितरण कार्यालयाकडून वसुली करण्यात येत आहे. आज (दि.२८) मंगळवारी माजलगाव नगर परिषदेने वीज बील न भरल्यामुळे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वाटर फिल्टरचे कनेक्शन महावितरणने दुपारी ४.३० वाजता तोडले. यावर खवळलेल्या माजलगाव पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अविनाश निळेकर यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देत तात्काळ महावितरणच्या उपविभागीय कार्यालय कडील घरपट्टी, नळपट्टी वसूल करा. अन्यथा त्यांच्या कार्यालयास सिल ठोका असे सागितले. त्यावर कर्मचाऱ्यांनी थेट महावितरण कार्यालय गाठत घरपट्टी, नळपट्टी भरा अशी मागणी करत महावितरण कार्यालयास सिल ठोकले.

महावितरणकडून नगर पालिकेकडे जवळपास १२ ते १५ कोटी थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे. तर नगर पालिकेकडून महावितरणकडे २ कोटी जवळपास बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

महावितरण – पालिकेच्या कारभाराचा जनतेने काय आदर्श घ्यायचा …

माजलगाव नगर परिषद व महावितरण हे जनतेच्या सेवेसाठी असलेल्या शासकीय व्यवस्था आहेत. मात्र या संस्था जनतेला पुरेपूर समाधानकारक सेवा देण्यात कित पत यशस्वी आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यातच यांचे हे वसुली भांडण पाहून जनतेने स्वतःचेच कान धरावे असे आहे.

Leave a Reply