तेलंगणाचे मुख्यमंत्री केसिआर यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Spread the love

झटपट बातमी :-

तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे. त्याच निमित्ताने नांदेड येथे आयोजित एका सभेतून त्यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना १० हजार रुपये द्यावेत. शेतीसाठी २४ तास मोफत वीज द्यावी. ज्या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी दिले जाते ते तेलंगणा प्रमाणे मोफत द्यावे. तसेच एकाद्या शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्यास ५ लाखाचा विमा सरकारने द्यावा, असे आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेड येथील जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

तेलंगणात शेतकरी वर्गासह सर्वसामान्य प्रती असलेल्या लोकोपयोगी योजनांमुळे सध्या महाराष्ट्रात ही के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे टेन्शन वाढलेले आहे. केसियार यांनी दिलेले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री आव्हान देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने घेतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष आहे.

Leave a Reply