माजलगाव शहरातील घटना
झटपट बातमी –
माजलगाव शहरातील फुले नगर येथील विवाहितेला चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी पती, सासू, दिरासह चार जनविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत बानोबी रफिक शेख हीचा विवाह माजलगाव शहरातील फुले नगर येथील शेख रफिक खलील याच्याशी झालेला होता. पती – रफिक खलील शेख, सासू – आरिफा उर्फ लतू खलील शेख, दिर – रईस खलील शेख, नणंद – सिमा ह्यांनी संगनमत करून मयत बानोबी हिस चारित्र्यावर संशय घेऊन तू काळी आहेस. तुला आई नाही, तुझ्या सोबत लग्न करून फसलोत, अशा अनेक कारणाने शिवीगाळ व मारहाण करत. तिला उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यातच दि.६ मार्च २०२३ रोजी बानोबी हिच्यावर आरोपीतानी संगणमत करून डावे डोळ्याचे पापनीवर, उजवे डोळ्यावर, डावे व उजवे कानावर कशाने तरी मारून जिवे ठार मारले. याप्रकरणी मयत बानोबी हीचा माहेरकडील नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. यावर माजलगाव पोलीसांनी शवविचेदन अहवाल येताच त्या अहवालात डोक्याला, डोळ्याला मार असल्याचे समोर आले.
त्यानुसार मयत बानोबी हीचा भाऊ सय्यद तारेख अब्दुलमन्नान रा. महमदिया कॉलणी, बीड यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (दि.२५) पती – रफिक खलील शेख, सासू – आरिफा उर्फ लतू खलील शेख, दिर – रईस खलील शेख, नणंद – सिमा यांच्याविरुद्ध कलम 302.498 (A), 323, 504,34 भादंवि नुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत असून पती रफिक शेख यास अटक करण्यात आली आहे.
