तिघांवर गुन्हा दाखल; धारुर तालुक्यातील कान्नापूर येथील घटना
झटपट बातमी –
उधारीवर किरणा साहित्य न दिल्यामुळे किराणा दुकानदाराला सतत त्रास दिला. या त्रासातून मानसिक छळ होत असल्याने नैराश्यातून किराणा दुकानदाराने गळफास घेवून आपलं आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी भावाच्या तक्रारीवरून तिघांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश अशोक देशमुख (वय 32, रा. कान्नापूर ता. धारुर) असे गळफास घेतलेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. अविनाश यांचे कान्नापूर येथे किराणा दुकान आहे. गावातीलच स्वप्नील रामकिशन देशमुख, सुरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाशने किराणा साहित्य उधार दिले नाही. याचा राग म्हणत धरून त्यांनी अविनाश देशमुख यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातून वारंवार मानिसक छळ होत असल्याने कंटाळून गुरुवारी रात्री अविनाशने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी स्वप्नील रामकिशन देशमुख, सूरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात मयत अविनाशचा भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक गित्ते हे करत आहेत.