माजलगाव येथे सैलानी बाबा संदल व उरूसचे आयोजन

Spread the love

माजलगाव, दि.२२: सैलानी बाबा संदल व उरूस चे शनिवार दि.२५ आयोजन शहराजवळील असलेल्या ढोरगाव-हिंगणवाडी शिवारात सैलानी बाबा यांचे दर्गा परिसर येथे आयोजन करण्यात आले आहे.याचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केले आहे.

या दर्ग्याच्या दर्शनासाठी जिल्हा भरातून व शेजारील जिल्ह्यातील विविध जाती धर्मातील भाविकांची मोठी उपस्थिती दरवर्षी असते. सकाळी 09:00 ते सायंकाळी 10:00 वाजेपर्यंत भाविक भक्तांचि दर्शनासाठी आलोट गर्दी पाहायला मिळते. ढोरगाव हिंगणवाडी शिवारात असलेल्या सैलानी बाबा यांच्या दर्ग्यात दरवर्षी पाडव्या नंतर तीन दिवसांनी संदल चे आयोजन करण्यात येते मागील अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. श्री. बाबुदादा राजेभाऊ गायकवाड पुजारी मोगरेकर फरशी कारखान्याजवळ, देवखेडा नांदुर, ता. माजलगांव जि.बीड यांच्या घरून दि.२५ मार्च २०२३ रोजी सायं. ६ मि. संदल बायपासने निघुन आंबेडकर चौकातून त्याच दिवशी रात्रौ ९.३० मि. सैलानी बाबांच्या दर्गा येथे पोहचते. महेमुद खाँन सिद्दीकी, यूसूफोईम कादरी, आगा खाँन साहाब, शेख महेबुब, रईस बाबा कादरी, शेख मुस्तकीम बाबा, सय्यद रफीक कादरी या सर्व मान्यवरांच्या हस्ते सैलानी बाबा दर्गाह येथे यावर्षी चादर चढविण्यात येणार आहे.संदल निमित्त्य दर्शनास सर्व जनतेने यावे असे आवाहन सैलानी बाबा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष विशालभाऊ गायकवाड यांनी या वेळी केले.

Leave a Reply