आयपीएस डॉ.धिरजकुमार यांच्या पथकाची कारवाई
माजलगाव,दि.20 ः सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.बी.धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाने जुगार्या विरूध्द कारवाई मोहिमेचा धडाकाच लावला आहे. सोमवारी तालुक्यातील आनंदगाव व घळाटवाडी येथील अड्यावर धाडरी टाकल्या. या दोन्ही कारवाईत रोक रक्कमेसह 1 लाख 36हजाराचा मुद्देमाल जप्त करत 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्याातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील आनंदगाव येथे पंडित गंगाधर थावरे यांच्या पडिक तिर्रट जुगार चालवित असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानूसार त्यांनी सोमवारी दुपारी 3.40 वाजता छापा मारला. त्याठिकाणी तिर्रट खेळत असतांना तीन जुगारी 1. मोहन बालासाहेब थावरे (वय 35), 2. तुकाराम राजाराम थावरे (वय 52), 3.मन्सुर इस्माईल शेख (वय 40) रा.आनंदगाव यांना जुगार साहित्यासह ताब्यात घेतले. तर इतर पाच जण पळून गेले. चौकशी अंती पळून गेलेले 4.दिपक दादाराव घायाळ, 5.पंडित गंगाधर थावरे, 6.नागनाथ किसन आगकर, 7.प्रकाश उत्तम थावरे, 8. पृथ्वीराज शिवाजी थावरे रा. आनंदगाव हे असल्याचे समजले. या ठिकाणी तिर्रट जुगाराचे साहित्य व रोख रूपये, 3 मोबाईल असा 88 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला. त्यावरून पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून दिंद्रड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

तसेच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घळाटवाडी येथे जुगार खेळत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानूसार त्या ठिकाणी आज दुपारी 4.45 वाजण्याच्या छापा मारला. याठिकाणी गावातील सार्वजनिक ठिकाणी 1. महादेव मुंजाबाा भोसले, 2.जिजाभाऊ भानुदास पठाडे, 3. रामेश्वर आसाराम काशिद, 4. भागवत वचिष्ट भोसले, 5. परमेश्वर विठ्ठल नरसाळे, 6. मुंजाबा सोपान झेटे, 7. प्रकाश गोविंद जाधव सर्व रा.घळाटवाडी हे तिर्रट जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यानूसार जुगाराचे साहित्य, रोख रूरूपये, 3 मोबाईल, एक मोटार सायकल असा एकुण 48 हजार 140 रूपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी रवि राठोड यांच्या फिर्यादीवरून माजलगााव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.बी.धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापेमारी जुगार्या विरूध्द कारवाईची मोहिम छेडल्याने धाबे दणाणले आहेत. या पथकामध्ये पोलीस नाईक अशोक नामदास, रवि राठोड, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे, संतराम थापडे आदीचा सहभाग होता.
