-
माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माजलगाव, दि.१८: विद्युत रोहीत्र नादुरुस्त झालेले असून त्याचा अहवाल मी तयार केला आहे. त्यावर सही कर म्हणून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला धक्का बुक्की करत शिवीगाळ केली. हा माजलगाव येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात शुक्रवारी घडला. याप्रकरणी प्रकरणी जुनेद नासीर शेख यांच्या विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात दि.१७ मार्च २०२३ रोजी येथे कनिष्ठ अभियंता शशीकांत शिवाजी मनुरे हे कामकाज करीत होतो. त्यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारस जुनैद नासीर शेख, राहणार फुले पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड हे मनुरे यांच्या जवळ येवुन म्हणाला, फुलेपिंपळगांव शिवारातील खामकर विद्युत रोहीत्र नादुरुस्त झालेले असुन त्याचा नादुरुस्त अहवाल मी तयार करुन आणलेला आहे. त्यावर तुम्ही सही करुन पुढे पाठवा. मी त्यांना खामकर रोहीत्र सद्यपरीस्थसितीत चांगले असुन खोटा अहवाल सादर करणार नाही असे म्हणाले. त्यावेळी जुनैद शेख मला याने “तुला नादुरुस्त अहवालावर सही करावी लागेल, तुला इथे नौकरी करायची नाही का? माझी तुझ्या वरीष्ठांपर्यंत ओळख आहे, तुझी बदलीच करुन टाकतो.” असे म्हणुन मला शिविगाळ करुन मनुरे यांच्यासोबत धक्का बुक्की केली. तसेच माझ्या विद्युत रोहञि अहवालावर सही ही केली तर तुला इथे कोणतेच काम करु देणार नाही असे म्हणुन माझ्या समोरील टेबलवर ठेवलेल्या कागदपत्रांच्या फाईल अस्ताव्यस्त फेकुन कामात अडथळा निर्माण केला. तसेच जुनैद शेख याने माझ्या समोरील टेबलवर ठेवलेला सिंगल फेज मीटर रागाने जमीनीवर फेकुन फोडुन नुकसान केले व तु सही कशी करीत नाही. तेच मी पाहतो असे म्हणुन तेथून निघुन गेला.
या प्रकरणी कनिष्ठ अभियंता शशिकांत मनुरे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व इतर कलमान्वये जुनैद नासीर शेख विरूद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करत आहेत.
