-
माजलगाव येथील अनेकांना तपास कामी बजावल्या नोटीस
माजलगाव, दि.१७: येथील भाजपचे कार्यकर्ते तथा व्यापारी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ॲक्शन मोडमधे आले आहेत. त्यानुसार त्यांनी तपास कामी माजलगाव येथील अनेकांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथे आज (शनिवारी) हजर राहणे बाबत कलम १६० सीआरपीसी नुसार नोटीस बजावल्या आहेत.
या नोटीसीत म्हटले आहे की, दि.८ मार्च २०२३ रोजी पोलीस ठाणे माजलगाव शहर जि.बीड येथे फिर्यादी अशोक तुळशीराम शेजुळ यांनी दिलेल्या जवाबा वरुन आरोपी नामे १) प्रकाश सुंदरराव सोळंके, २) मंगलबाई प्रकाश सोळंके, ३) रामेश्वर रामदयाल टवाणी सर्व रा. माजलगाव ता. माजलगाव व इतर ५ ते ६ अनोळखी आरोपीतां विरुध्द दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे माजलगाव शहर गुरनं ८३/२०२३ कलम ३०७, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी गुन्ह्याच्या घटने संदर्भात माहिती मिळवण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी माजलगाव शहरातील अनेकांना नोटीस बजावल्या आहेत. या नोटिसद्वारे शनिवार दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथे हजर होण्या बाबत सांगितले आहे.